औरंगाबाद – दिवाळीनिमित्त औरंगाबादमधील वाळूज येथून पाच वर्षांच्या
भाचीला घेऊन वैजापूरला निघालेल्या मामाच्या बाईकला भरधाव वेगाने आलेल्या आयशरने
धडक दिली आहे. ही घटना खोजेवाडी शिंदीशिरसगाव
फाट्यावर बुधवारी सकाळी ९ वाजता घडली आहे. या भीषण अपघातात मामा दिपक मेहेर यांचा जागीच
मृत्यू झाला तर पाच वर्षांची चिमुकली वैष्णवी मृत्यूशी झुंज देत आहे. अपघातानंतर
रस्त्यावर रक्तामासाचा सडा पडलेला होता.
रस्त्यावर पडला रक्तामासाचा सडा
दीपक पुनमचंद मेहेर
(25) हे जोगेश्वरी
येथून बहिणीच्या घरून पाच वर्षीय भाची वैष्णवी पोपटसिंह सत्तावन हिला घेऊन बाईकवरुन वैजापूर
तालुक्यातील बेंडेवाडी येथील घरी निघाले होते. यावेळी खोजेवाडी शिंदीशिरसगाव
येथील फाट्यावर त्यांच्या दुचाकीला वेगाने आलेल्या आयशरने धडक दिली. मामा-भाचीला आयशरने चिरडले असून रस्त्यावर
रक्तामासाचा सडा पडलेला होता. या भीषण अपघात 25 वर्षीय मामाचा
जागीच मृत्यू झाला तर चिमुकलीला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ती
मृत्यूशी झूंज देत आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघातानंतर आयशर चालक फरार झाला आहे, वाळूज पोलिस
त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेची माहिती
मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आयशर चालक फरार असून
त्याचा तपास सुरु आहे.












